शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कटाचे धागे राज्यभरात, १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 05:37 IST

सणांमध्ये घातपात घडविण्याचा कट दहशतवादविरोधी पथकाने उधळल्यानंतर त्याचे धागे राज्यात दूरवर असल्याचे पुढे आले आहे. एसटीएसने दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत राज्यातून आणखी १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत.

मुंबई - सणांमध्ये घातपात घडविण्याचा कट दहशतवादविरोधी पथकाने उधळल्यानंतर त्याचे धागे राज्यात दूरवर असल्याचे पुढे आले आहे. एसटीएसने दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत राज्यातून आणखी १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. शुक्रवारी अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्याच्या घरातून एटीएसने १० गावठी पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त केला.बकरी ईद व गणेशोत्सवात मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा येथील वर्दळीच्या ठिकाणी स्फोट घडविण्याचा कट होता. त्यानुसार रेकी करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.नालासोपारा येथे सनातन संस्थेशी संबंधित वैभव राऊत याच्या घरातून एटीएसने २२ गावठी बॉम्बसह स्फोटकांचा साठा शुक्रवारी जप्त केला. राऊतसह शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसने अटक केली आहे. शनिवारी ताब्यात घेतलेले तरुण पुणे, सोलापूर, सातारा परिसरातील असून घातपाती कृत्ये करण्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय एटीएसला आहे.जप्त केलेली स्फोटके ‘एफएसएल’कडे तपासणीसाठी पाठविली आहेत. त्याच्या अहवालानंतर स्फोटकांच्या साहित्याची तीव्रता स्पष्ट होईल, असे एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.वैभव राऊत कटाचा मुख्य सूत्रधार होता. त्याच्या संपर्कात असलेल्यागोंधळेकर व कळसकर यांच्याकडूनही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे मोबाइल रेकॉर्ड्स तपासण्यात येत आहेत.आणखी साहित्य जप्तएटीएसने पुण्यातून अटक केलेल्या शिवप्रतिष्ठान संस्थेशी संबंधित सुधन्वा गोंधळेकर याच्याकडील चौकशीनंतर शनिवारी आणखी हत्यारे व साहित्य जप्त केले.जिवंत काडतुसांसह १० गावठी पिस्तुले, १ गावठी कट्टा, १ बंदूक, १० पिस्तुल बॅरल, प्रत्येकी ६ अर्धवट पिस्तुल बॉडी, काडतुसे, ३ मॅग्झिन, ७ पिस्तुल स्लाइड, १६ रिले स्विच, वाहनाच्या सहा नंबर प्लेट तसेच चॉपर आदी जप्त केले. हत्यारांचा वापर घातपाती कृत्यासाठी वापर करायचा होता, असे अधिकाºयानी सांगितले.गोंधळेकरकडे शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च बॅटरी, हॅण्ड ग्लोव्हज्, स्फोटकांबाबतची माहिती पुस्तिका, रिले स्विच सर्किट ड्रॉर्इंग पेन ड्राइव्हज्, हार्डडिक्स, मेमरी कार्ड व पुस्तकेही सापडली असून, त्यांचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जात होता, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस