महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील अपघातात १२ भाविक ठार

By Admin | Updated: June 2, 2014 13:13 IST2014-06-02T13:13:33+5:302014-06-02T13:13:44+5:30

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कुडल हंगरगा गावाजवळ भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात १२ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली.

12 pilgrims killed in Karnataka road accident | महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील अपघातात १२ भाविक ठार

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील अपघातात १२ भाविक ठार

ऑनलाइन टीम

बेळगाव, दि. २ - महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कुडल हंगरगा गावाजवळ भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात १२ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. गुलबर्गा येथील ख्वाजा बंदे नवाझ दर्गा येथे दर्शनासाठी निघालेल्या अक्कलकोट येथील भाविकांना जीव गमवावा लागला असून आणखी २० जण जखमी झाले आहेत.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसची मिनी टेम्पोशी सोमवारी पहाटे धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. यात १२ प्रवासी जागीच ठार झाले. सर्व मृत नागरिक हे अक्कलकोट तालुक्यामधील  तडवळचे रहिवासी होते. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह आळंदमधील प्राथमिक केंद्रात पाठवण्यात आले आहेत. तर जखमींवर सोलापूर व गुलबर्गाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: 12 pilgrims killed in Karnataka road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.