शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सार्वभाैम अधिकारांचा ‘त्या’ निर्णयाने संकोच; राष्ट्रपती काेविंद यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 10:04 IST

बारा आमदार निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद सुरूच

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेने बारा आमदारांचे केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सार्वभौम विधिमंडळाच्या अधिकारांचा संकोच होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारांचा वापर करत न्यायालयाच्या निर्णयाचा परामर्श घ्यावा, अशी विनंती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

बारा भाजप आमदारांचे वर्षभराचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यावरून न्यायपालिका आणि विधिमंडळाच्या अधिकारांचा प्रश्न उपस्थित झाला. यासंदर्भात शुक्रवारी रामराजे नाईक-निंबाळकर, नरहरी झिरवळ आणि नीलम गोऱ्हे यांनी राजभवन येथे राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेत निवेदन सादर केले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर त्याची सविस्तर माहिती  माध्यमांना देण्यात आली.

त्यावेळी नाईक-निंबाळकर म्हणाले की, ‘बारा आमदार निलंबन आणि त्यावरील न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभांमधील ‘सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण’ हे तत्त्व   बाधित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी हा विषय घटनापीठाकडे सोपवून याबाबतची स्पष्टता करावी. राष्ट्रपतींना तसे अधिकार आहेत, अन्यथा आम्हाला विधिमंडळाचे कामकाज करणे अवघड होईल.’ याबाबत स्पष्टता यायला हवी

राष्ट्रपती कोविंद यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. १५ मिनिटे संवाद आमचा झाला. यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी याबाबत सर्व बाबी तपासून घेण्याचे आश्वासन दिल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. ७० वर्षांच्या लोकशाहीत प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच हस्तक्षेप करून अशा प्रकारचा निर्णय घेतला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्हाला भाष्य करायचे नाही; पण यासंदर्भात एकदा स्पष्टता यायला हवी. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून या प्रकरणातील न्यायालयीन हस्तक्षेप स्वीकारला. सध्या हे आमदार विधिमंडळात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय