पायधुनीतून ११ लाखांच्या बनावट सिगारेट्स जप्त

By Admin | Updated: January 20, 2017 02:03 IST2017-01-20T02:03:32+5:302017-01-20T02:03:32+5:30

पायधुनी परिसरात समाजसेवा शाखेने छापा टाकून ब्रॅण्डेड विदेशी कंपनीच्या ११ लाख किमतीच्या बनावट सिगारेट्स जप्त केल्या आहेत.

11 lakh fake cigarettes seized from footpath | पायधुनीतून ११ लाखांच्या बनावट सिगारेट्स जप्त

पायधुनीतून ११ लाखांच्या बनावट सिगारेट्स जप्त


मुंबई : पायधुनी परिसरात समाजसेवा शाखेने छापा टाकून ब्रॅण्डेड विदेशी कंपनीच्या ११ लाख किमतीच्या बनावट सिगारेट्स जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघांना कॉपी राईटच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. इम्तीयाज मुर्तुझा खान (४९), नादिर नुरमोहम्मद शेख (४२) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पायधुनी येथील सारंग स्ट्रीट परिसरातील दिल्लीवाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ब्रॅण्डेड विदेशी कंपनीच्या बनावट सिगारेट्सचा साठा असून, पुरवठा केला जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक गिड्डे यांच्या तपास पथकाने तपास सुरू केला आणि या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
या वेळी समाजसेवा शाखेने रुली रिवर कंपनीचे २०० बॉक्स, विन कंपनीचे २७५, परीस कंपनीचे २५ बॉक्स अशा अंदाजे ११ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट सिगारेट्स जप्त केल्या.
इम्तीयाज हा पायधुनी तर नादिर मानखुर्द येथील रहिवासी आहे. दोघेही अभिलेखावरील आरोपी आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 11 lakh fake cigarettes seized from footpath