शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हानिहाय ११ कंपन्या, तीन वर्षांसाठी योजना राबविण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 08:22 IST

Crop Insurance: राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा जाहीर केल्यानंतर यासाठी जिल्हानिहाय ११ विमा कंपन्या निश्चित केल्या आहेत. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे.

मुंबई - राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा जाहीर केल्यानंतर यासाठी जिल्हानिहाय ११ विमा कंपन्या निश्चित केल्या आहेत. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. यंदापासून एक रुपयात पीक विमा व कापणी पश्चात नुकसानीसाठी ३० टक्के तंत्रज्ञान आधारित भारांकन निश्चित केले जाणार आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेच्या नवीन कार्यपद्धतीनुसार सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. 

विमा हप्ता सरकार भरणारn या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रकमेतून एक रुपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे. n या योजनेसाठी याआधी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. 

योजना पुढील तीन वर्षांसाठी : या वर्षीपासून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर आलेल्या कंपन्यांमधून ११ कंपन्या निश्चित केल्या असून, खरीप हंगामासाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

जिल्हा आणि निश्चित केलेल्या कंपन्याn अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि. n परभणी, वर्धा, नागपूर : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. n जालना, गोंदिया, कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड n नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि. n छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कं.n वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार : भारतीय कृषी विमा कं.n हिंगोली, अकोला, धुळे, पुणे : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि n यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडn धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. n लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं. लि. n बीड : भारतीय कृषी विमा कंपनी 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र