शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

राज्यातील १०६ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव; भाषणबाजीशिवाय साताऱ्यात थाटात पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:30 AM

भाषणबाजी, घोषणा यांना फाटा देत बुधवारी राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यभरातील १०६ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.

सातारा : भाषणबाजी, घोषणा यांना फाटा देत बुधवारी राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यभरातील १०६ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अभिनेता आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम पारपडला. मंत्री तावडे यांच्यासह कोणाचीच भाषणे झाली नाहीत. तरीही एकूणच कार्यक्रम थाटात पार पडला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना फेटे बांधलेले होते. कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. शासनाने आॅनलाईन पद्धतीने या पुरस्कारांसाठी निवड केल्याने हे काम पारदर्शकरीत्या झाले आहे, अशी भावना पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी व्यक्त केली. बहुतांश शिक्षक कुटुंबियांसह कार्यक्रमासाठी आले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र त्यांचा संदेश असलेली ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही बाबी तंत्रस्नेही असतील तर चमत्कार घडू शकतात. आपले शिक्षक अत्यंत उत्तम पद्धतीने ज्ञानदानाचे काम करत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले.खासगी शिकवण्याशिवाय आम्ही मोठे झालोकोणत्याही मोठ्या शाळेची झूल नाही अन् खासगी शिकवणीशिवाय शाळेचं शिक्षण घेतलं. मराठी माध्यमाच्या शाळेने आम्हाला भाषेचा स्वाभिमान दिला. या शब्दात अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांच्या शालेय आयुष्याचा प्रवास उलगडला.रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरतीआमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत दिली.‘शिक्षकांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो’या कार्यक्रमात अभिनेता आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री व भरत जाधव यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. या तिघांच्याही गप्पांचा कार्यक्रम यावेळी झाला. आज आम्ही जे काही आहोत, त्यामध्ये पहिली ते दहावी या शालेय शिक्षण काळात शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आहोत, असे या कलाकारांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Teacherशिक्षक