शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे १०५ जोडपी विभक्त, घटस्फोटाची प्रकरणे सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 02:07 IST

महत्त्वाच्या कामांमुळे तारखेला हजर राहणे शक्य नसलेल्या दाम्पत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) नाते संपविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे.

पुणे : महत्त्वाच्या कामांमुळे तारखेला हजर राहणे शक्य नसलेल्या दाम्पत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) नाते संपविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये कौटुंबिक न्यायालयातील १०५ दावे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यात घटस्फोटांची प्रकरणे सर्वाधिक आहेत.राज्यच काय तर आता देश-विदेशातील जोडपेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) घटस्फोट घेत असल्याचे प्रकार वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. घटस्फोट घ्यायचा म्हटले की काही वर्षांपूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत. त्यात दोघेही तारखांना हजर राहणे गरजेचे असायचे. मात्र दोघांपैकी एखादा व्यक्ती काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही किंवा तो कामानिमित्त परदेशात असेल तर खटला पुढे ढकलला जात. तसेच पती किंवा पत्नी परदेशातील असेल तर तिला किंवा त्याला दावा दाखल केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक असायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. दोन्हींपैकी एक व्यक्ती जर न्यायालयात असेल तर व्हीसीद्वारे संवाद साधूनदेखील त्यांना घटस्फोट मिळत आहे.वेळ व पैसा वाचतोयनिकाली लागलेल्या दाव्यांमधील अनेक पक्षकार हे परदेशामध्ये राहणार होते. त्यांना सुटी काढून किंवा भाडेखर्च करून खटल्याच्या प्रत्येक तारखेला येणे शक्य होत नाही. त्यामुळे या व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधून खटला निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. या तंत्रज्ञानामुळे परदेशात असलेल्या पक्षकारांना फायदा होत असून, त्यांचा वेळा आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचत आहे.कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वकील आणि पक्षकारांच्या सोयीसाठी अनेक अद्ययावत तंत्रज्ञान कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हादेखील त्यातलाच एक प्रकार आहे.दिवसेंदिवस कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या वाढत आहे. खटल्याच्या प्रत्येक तारखेला त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा पक्षकारांच्या सोयीसाठी व्हीसीचा आधार घेण्यात येत आहे.स्काईप, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अगदी मोबाइलवर, संगणकावर व्हिडीओ कॉल करून ११ महिन्यांच्या कालावधीत १०५ दावे निकाली काढण्यात आलेले आहेत, अशी माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.

टॅग्स :Divorceघटस्फोटPuneपुणे