शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 10:32 IST

ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे.

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतून नेपाळमध्येपर्यटनासाठी गेलेले १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमध्ये उद्भवलेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेपाळचा प्रवास टाळावा, तसेच जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. 

ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी नेपाळमधील  ९७७-९८० ८६० २८८१ आणि  ९७७-९८१ ०३२ ६१३४ हे दोन मोबाइल क्रमांक तर राज्यातील  ९१- ९३२१५८७१४३  आणि  ९१-८६५७११२३३३ हे दोन मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले असून या क्रमांकांवर व्हॉट्सअॅप कॉलही लावता येईल.

पर्यटकांना सुखरूप परत आणण्यास प्राधान्य

नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये.-अजित पवार, उपमुख्यमंत्री

पर्यटनाला फटका, ५०० पर्यटकांनी केला नेपाळ दौरा रद्द 

कोल्हापुरातून नेपाळसाठी प्रत्येक वर्षी हजारांहून अधिक पर्यटक जातात. नेपाळमधील सुंदर मंदिरे, स्वच्छता अन् एकूणच तेथील संस्कृतीची भुरळ उभ्या देशाला आहे. नेपाळचे हेच सौंदर्य पाहण्यासाठी कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी हजारांच्या वर पर्यटक नेपाळला जातात. मात्र, नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नेपाळ सहलीवर जाणाऱ्या कोल्हापुरातील ५०० हून अधिक इच्छुक पर्यटकांनी नेपाळ दौरा रद्द केला आहे.

नेपाळमधील उद्रेक पाहून पर्यटकांनी टूरिस्ट कंपन्यांना मेल पाठवून बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, टूरिस्ट कंपन्यांनी विमानांचे तिकीट आधीच बुक केल्याने ते तिकीट रद्द करण्यास विमान कंपन्या तयार नाहीत. आम्ही सेवा द्यायला तयार आहोत, असा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतल्याने टूरिस्ट कंपन्यांचीही गोची झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० पर्यटकांनी त्यांचा नियोजित नेपाळ दौरा रद्द केला आहे . यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असे  कोल्हापूर जिल्हा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सांगितले.

टॅग्स :NepalनेपाळCorruptionभ्रष्टाचारSocial Mediaसोशल मीडियाMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन