शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 23:47 IST

रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही.

नागपूर: धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अपवाद वगळता प्रत्येकालाच मोबाईल आपला सखाहरी वाटतो. चार्जिंग संपून तो बंद झाला तरी माणसाला मोठी कमतरता जाणवते. मोबाईल हरवला की माणूस थेट 'पॅनिक मोड'मध्ये जातो. त्याला सगळ जग थांबल्यासारख वाटतं. अशा स्थितीत रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही. खरे वाटो की खोटे, हे वास्तव आहे !

विविध गुन्ह्यांचा छडा लावताना रोख रक्कम, दागिने आणि माैल्यवान चिजवस्तूंसह रेल्वे पोलिसांच्या हाती शेकडो मोबाईल अन् लॅपटॉपही लागले. संबंधितांनी आधीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सोयीनुसार कायदेशिर प्रक्रिया पार पाडून अनेकांनी आपापल्या चिवजस्तू पोलिसांकडून परत नेल्या. मात्र, १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप ‘अनाथ’च राहिले. ज्याचे त्याने परत घेऊन जावे म्हणून रेल्वे पोलिसांनी वेळोवेळी जाहिराती व नोटीस काढून मालकांना हाक दिली. पण कोणीच दाद देईना. एक दशकापेक्षा जास्त कालावधीपासून मोबाईलसह धूळखात पडून असलेले लॅपटॉपही आता निकामी झाले आहेत. त्याचे काय करावे, असा प्रश्न पडल्याने शेवटी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.

'त्या सर्वांचा' लिलाव कराकोर्टाने पोलिसांच्या मालखान्यात धूळ खात पडलेल्या मोबाईल, लॅपटॉपवर निर्णय देताना 'त्या सर्वांचा' लिलाव करा आणि त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा करा, असे आदेश दिले. त्यामुळे आता या मोबाईल, लॅपटॉपचा लिलाव मंगळवारी ५ ऑगस्टला रेल्वे पोलीस ठाण्यात केला जाणार आहे.

अपवाद पुन्हा एकदा अधोरेखित!गावखेडे असो की शहर, व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्यांच्याकडे मोबाईल नसेल असा विरळाच. लाडका मोबाईल नेहमीच जवळ असावा, असा जवळजवळ प्रत्येकाचा आग्रह असतो. जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा मिळेपर्यंत तो शांत बसत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीला 'काही लोक अपवाद असतात' हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर