शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला 10 वर्षांचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:25 IST

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील आरोपी आकाश पुंडलिक राऊत (२१, रा. वेंगुर्ला-गावडेवाडी) याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा वि. विरकर यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सिंधुदुर्ग : सूड उगविण्याच्या हेतूने धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील आरोपी आकाश पुंडलिक राऊत (२१, रा. वेंगुर्ला-गावडेवाडी) याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा वि. विरकर यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलगी ही आकाशच्या प्रेयसीची मैत्रीण होती. आकाश व त्याची प्रेयसी यांच्यात काही कारणाने वाद झाल्याने दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. पीडित मुलीने आपल्या प्रेयसीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा समज आकाश याने करून घेत डोक्यात राग भरला होता.२० आॅक्टोबर २०१६ रोजी पीडित मुलगी शिकवणीला जात असताना वेंगुर्ले येथील एका हॉटेलसमोर दुचाकी थांबवून आकाशने तिला थांबवले. तिला घरी असलेल्या आपल्या मावशीला प्रेयसीसोबतच्या प्रेम प्रकरणाची माहिती देण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. त्यानुसार ती त्याच्या घरी गेली. मात्र त्यावेळी आकाशच्या घरी कोणीच नव्हते. प्रेयसीला दूर केल्याच्या घटनेचा बदला घेणार असल्याचे सांगत आकाश याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.दरम्यान, या प्रकरणी आरोपी आकाश याच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी प्रमुख न्यायाधीश विभा विरकर यांच्यासमोर झाली. यावेळी सहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अंमलदार म्हणून वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. डी. गोरड यांनी काम पाहिले. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांनुसार न्यायालयाने आकाश याला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले.दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश१० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने जादा कारावास, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने जादा कारावास, तसेच अन्य एका गुन्ह्यात १ वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना जादा कारावास अशी शिक्षा सुनावली. विविध तीन कलमांतर्गत ठोठावण्यात आलेली शिक्षा एकत्रित भोगण्यास मुभा देण्यात आली असून दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वर्षभरातच शिक्षा मिळाल्याने समाधान : खानोलकरया शिक्षेनंतर सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले. आजकाल काही तरूण इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पॉर्न साईट्स बघत असतात. त्यामुळे असे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. मात्र, घटना घडल्यापासून केवळ एका वर्षात झालेली ही शिक्षा पाहता अशा प्रकारांना वचक बसेल.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग