जर्किन घेतले नाही म्हणून १० वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

By Admin | Updated: December 22, 2014 13:54 IST2014-12-22T13:51:40+5:302014-12-22T13:54:44+5:30

पालकांनी जर्किन घेऊन दिले नाही म्हणून १० वर्षांच्या मुलाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

The 10-year-old son committed suicide as Jarkin did not have taken | जर्किन घेतले नाही म्हणून १० वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

जर्किन घेतले नाही म्हणून १० वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ -  पालकांनी जर्किन घेऊन दिले नाही म्हणून १० वर्षांच्या मुलाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शहरातील धनकवडी परिसरात रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 
बांधकाम व्यावसायिक असलेले सुनील पिसाळ यांच्या बहिणीचा वाढदिवस असल्याने सर्व कुटुंबिया काल रात्री बाहेर जेवण्यासाठी जाणार होते.  मात्र त्यावेळी पिसाळ यांचा मुलगा आदित्यने आपल्याला जर्किन घेऊन देण्याचा हट्ट केला. जर्किन घेतले नाही तर बाहेर येणार नाही, असेही त्याने पालकांना सांगितले. मात्र आपण स्वेटर घेऊया असे त्याच्या आईने त्याला सांगितले. या प्रकामुळे रागावलेला आदित्य जेवायला बाहेर न जाता घरीच थांबला. आणि त्या रागातच त्याने सव्वादहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
एवढ्या शुल्लक कारणामुळे चिमुरड्याने जीवन संपवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 

Web Title: The 10-year-old son committed suicide as Jarkin did not have taken