महावितरणकडून १ डिसेंबरपासून वीजग्राहकांना १० रुपयांची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:17 IST2018-11-29T06:17:05+5:302018-11-29T06:17:24+5:30
कागदविरहित बिल भरल्यास फायदा : ईमेल, एसएमएसचा पर्याय उपलब्ध

महावितरणकडून १ डिसेंबरपासून वीजग्राहकांना १० रुपयांची सवलत
मुंबई : ग्राहकांनी वीजबिल आॅनलाइन भरावे, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महावितरणने वीजग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भातील धोरणास प्रोत्साहन देण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ईमेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारतील; अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रति बिल १० रुपये सवलत दिली जाणार आहे.
वीजबिलाची माहिती, वीजबिल भरण्यासाठी मोबाइल अॅप व www.mahadiscom.in यावर आॅनलाइनसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सुविधा असतानाही ग्राहकांना छापलेले वीजबिलही उपलब्ध करून दिले जाते. जे ग्राहक गो-ग्रीनचा पर्याय निवडतात, त्यांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे विजेचे बिल दिले जाते. या सर्व ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रति बिल १० रुपये सवलत मिळेल.
गो-ग्रीन पर्यायासाठी अशी करा नोंदणी
गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांना वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणचे मोबाइल अॅप किंवा महावितरणचे संकेतथळ https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी लागेल. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना विजेचे बिलदेखील तातडीने मिळणार आहे.