चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:53 AM2019-08-07T10:53:10+5:302019-08-07T10:57:10+5:30

पंढरपुरात पुर परिस्थिती; विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीकडून पूरग्रस्तांना जेवणाची सोय

1 lakh 3 thousand cusecs of water in the Chandrabhaga river basin; 4,000 people moved to safety! | चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले!

चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले!

googlenewsNext
ठळक मुद्दे- पंढपुरात पुर परिस्थिती निर्माण, प्रशासन सज्ज- भीमा नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविले- नागरिकांना विठ्ठल मंदीर समितीकडून जेवणाची केली सोय

पंढरपूर : पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण १०० टक्के भरत आहे. तसेच जनी धरणातून व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विसगार्मुळे चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये ४ लाख ४० हजार क्युसेक पाणी आहे. यामुळे चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.

नदी काठच्या हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. तसेच प्रशासनामार्फत त्यांची राहण्याची सोय व मंदिर समिती मार्फत त्यांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. आणखीन चार पाच तासाच्या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीवरील नवीन पूल व अहिल्या पूल हेदेखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन पुलावरून वाहतूक थांबविण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Web Title: 1 lakh 3 thousand cusecs of water in the Chandrabhaga river basin; 4,000 people moved to safety!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.