लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मंत्री, राज्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकरिता ॲपल ब्रँडचे आयपॅड आणि संबंधित वस्तू खरेदी करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. साहित्यासह एका आयपॅडची किंमत २ लाख १३ हजार रुपये इतकी आहे.
मंत्र्यांसाठी असे ५० आयपॅड खरेदी केले जाणार आहेत. त्यांची किंमत १ कोटी ६ लाख ५७ हजार होत आहे. आयपॅडसोबतच मॅजिक की-बोर्ड, ॲपल पेन्सिल, कव्हर, ॲडप्टर आणि केबल दिले जाणार आहे. या खरेदीसाठी रेडियस सिस्टम्स या सेवा पुरवठादार संस्थेला पुरवठा कंत्राट देण्यात आले.
यासंदर्भात ९ एप्रिल २०२५ रोजी पहिली ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. तांत्रिक छाननीमध्ये एकही निविदाकार पात्र न ठरल्याने १३ मे २०२५ रोजी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेनुसार प्राप्त अर्जांच्या तांत्रिक आणि व्यावसायिक छाननीनंतर रेडियस सिस्टम्सला पात्र ठरवण्यात आले.
एका आयपॅडची अशी आहे किंमत
- ॲपल आयपॅड १,६५,८४३
- मॅजिक की-बोर्ड ३१,१८७
- ॲपल पेन्सिल ७,२६८
- ॲपल कव्हर ८,८५०
- ॲडप्टर १.१८
- केबल १.१८