शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

‘कमल’ की कमलनाथ?; मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:31 IST

मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान आहे.

- कमलेश वानखेडेनागपूर : मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शक्ती पणाला लावली. बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. आता मतदारांना ‘कमल की कमलनाथ?’ यावर विचार करायला पुढील दोन दिवस मिळणार आहेत. यावेळी मध्य प्रदेशात भाजपचा पत्ता साफ होईल, असा काँग्रेसचा दावा आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची जादू काम करेल, असा भाजपला विश्वास आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल. 

प्रचारात भाजपने शक्ती पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह ३९ स्टार प्रचारक मैदानात उतरले.  काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी सभा व रोड शो करीत मोर्चा सांभाळला. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह व सचिन पायलट यांनी सुमारे २०० हून अधिक सभा व रोड शो केले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकट्याने तब्बल १६० सभा व रोड शो तर कमलनाथ यांनी एकट्याने ११४ सभा व रोड शो केले.

‘त्या’ ३८ जागांवर भाजपचा फोकस 

भाजपने विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी महाकौशल विभागातील ३८ जागांवर फोकस केला आहे. २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसने येथील ३८ पैकी २४ जागा जिंकत ११४ पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भाजपने या विभागातील  जबलपूर, छिंदवाडा, कटनी, सिवनी, नरसिंहपूर, मांडला, डिंडौरी व बालाघाट या आठ जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने या विभागात  केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते व प्रल्हाद पटेल यांना रिंगणात उतरवून सामना फिरवण्याचा प्लॅन आखला आहे.

महिला मतदार ठरणार निर्णायक

मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली आहे. ७ जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच महिला मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. nमहिला मतदारांवर लक्ष केंद्रित करत घोषणा करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘लाडली बहना’ योजना जाहीर करताच काँग्रेसनेही ‘नारी सम्मान योजने’ची घोषणा करीत महिलांना साद घातली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील प्रत्येक महिलेला लखपती करू तसेच ‘लाडली बहना’ योजनेतून सुटलेल्या महिलांची नावे समाविष्ट करण्याची घोषणा केली.  

योगी आदित्यनाथ, फडणवीस यांच्या प्रचारसभा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, फग्गनसिंह कुलस्ते, स्मृती इरानी, उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांनी प्रचारसभा घेत मैदान गाजवले. काँग्रेसकडून स्टार प्रचारक महासचिव प्रियंका गांधी यांनी दतिया व चंडवाही येथे जाहीर सभा घेत भाजपला गेल्या १८ वर्षांतील कामांचा हिशेब मागितला. भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस अध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगे यांनीही  बैतूल, बैरसिया व भोपाळ येथे जाहीर सभा घेत मतदारांना साद घातली. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेस