शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्याचं स्वागत करणं काँग्रेस नेत्यांना पडलं महागात, पक्षाकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:47 IST

मध्य प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचं स्वागत केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर पक्षानं कारवाई केली आहे.

मध्य प्रदेशात एका भाजप नेत्याचे स्वागत करणं काँग्रेसच्या नेत्यांना चांगलच महागात पडलं आहे. मध्य प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचं स्वागत केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर पक्षानं कारवाई केली आहे. याप्रकरणी इंदूरच्या काँग्रेस शहर आणि ग्रामीण अध्यक्षांना पक्षानं निलंबित केलं आहे. तसंच, संघटन प्रभारी राजीव सिंह यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरजीत चढ्ढा आणि ग्रामीण अध्यक्ष सदाशिव यादव यांना नोटीस बजावून ७ दिवसांत खुलासा मागवला आहे.

प्रदेश उपाध्यक्ष आणि संघटन प्रभारी यांनी नोटीसमध्ये लिहिलं आहे की, एक असा व्यक्ती, ज्यानं माता अहिल्याच्या नगरीत लोकशाही मूल्यांची हत्या केलीय. इंदूरच्या जनतेकडून मतदानाचा हक्क काढून घेऊन त्यांनी इंदूरची देश-विदेशात बदनामी केली, ज्याचा इंदूरच्या जनतेनं निषेधही केला. अशा व्यक्तीचं इंदूर जिल्हा काँग्रेस कमिटी गांधी भवनात स्वागत करणं, हे अनुशासनहीनतेच्या श्रेणीत येतं. तुम्ही तुमचं स्पष्टीकरण सात दिवसांत द्या. या कालावधीत तुम्हाला तुमच्या सध्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, अलीकडेच एक पेड माँ के नाम मोहिमेत काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि इतर भाजप नेते इंदूरमधील जिल्हा काँग्रेस कार्यालयात गेले होते. यावेळी काँग्रेस कार्यालयात कैलाश विजयवर्गीय यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच, त्यांना मिठाई सुद्धा भरवण्यात आली होती. दरम्यान, याबाबत काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता याप्रकरणी काँग्रेस ग्रामीण व शहराध्यक्षांना निलंबित करण्यात आलं आहे.

विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं होतंलोकसभा निवडणुकीच्यावेळी कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं होतं. तसंच, 'इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचं भाजपमध्ये स्वागत आहे,' अशी एक्सवर पोस्ट कैलाश विजयवर्गीय यांनी केली होती. दरम्यान, अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळं इंदूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एकही उमेदवार लोकसभा निवडणूक लढवू शकला नाही. त्यामुळं भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांना ऐतिहासिक विजय मिळाला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण