भीषण दुर्घटना, शाळेतील विद्यार्थ्यांवर कोसळली भिंत, ढिगाऱ्याखाली सापडून ४ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 20:16 IST2024-08-03T20:16:31+5:302024-08-03T20:16:58+5:30
Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका गावात शालेय विद्यार्थ्यांवर भिंत कोसळून झालेल्या अपघाताता ४ मुलांचा मृत्यू झाला.

भीषण दुर्घटना, शाळेतील विद्यार्थ्यांवर कोसळली भिंत, ढिगाऱ्याखाली सापडून ४ मुलांचा मृत्यू
मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका गावात शालेय विद्यार्थ्यांवर भिंत कोसळून झालेल्या अपघाताता ४ मुलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये एकाच कुटुंबांतील तीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर ही मुले शाळा सुटल्यानंतर शाळेच्या गेटजवळ उभी होती. तेवढ्यात शेजारी असलेल्या एका घराची भिंत या विद्यार्थ्यांवर कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुलं सापडली. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तसेच या मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना त्वरित संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही सर्व मुले सनऋषी शाळेचे विद्यार्थी होते. याशिवाय या दुर्घटनेत एक महिलासुद्धा जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार सतत पडत असलेल्या पावसामुळे जुन्या मातीच्या घराची भिंत ओली झाली होती. त्यामुळे ती कोसळून शाळेतील मुले तिच्या खाली सापडली. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबातील अंशिका गुप्ता, सिद्धार्थ गुप्ता आणि मान्या गुप्ता या ३ मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच अनुज प्रजापती या मुलाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर राणी प्रजापती ही महिला या दुर्घटनेत जखमी झाली.