शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 14:31 IST

Rahul Gandhi on ECI: राहुल गांधी निवडणूक आयोगाशी दोन हात करण्याच्या मूडमध्ये आहेत.

Rahul Gandhi on ECI:काँग्रेस नेते राहुल गांधी बनावट मतदार यादीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. अलिकडेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत कथित पुरावेही सादर केले. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या सर्व आरोपांचे खंडन केले असून, राहुल यांनी शपथपत्र सादर करावे किंवा त्यांच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आरोपांसाठी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी थेट आयोगाशी दोन हात करण्याच्या मूडमध्ये आले आहेत.

निवडणूक आयोगाविरुद्ध करा किंवा मराच्या मूडमध्ये 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (१० ऑगस्ट २०२५) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, मतांची चोरी हा 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. आमची मागणी आहे की, निवडणूक आयोगाकडे पारदर्शकता दाखवून डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करावी, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे ऑडिट करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील होऊन या मागणीला पाठिंबा देऊ शकता - http://votechori.in/ecdemand ला भेट द्या किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल द्या. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे.

नेत्यांनी पुराव्यांसह विधाने करावीत - ECIराहुल गांधी यांनी अलिकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाने यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आणि म्हटले की, राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता, तर २०१८ मध्ये या प्रकरणात आधीच कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मते, काँग्रेस नेत्याने केलेले आरोप तथ्यांवर आधारित नाहीत आणि आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी नेत्यांनी तथ्ये आणि पुराव्यांसह विधाने करावीत असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेसVotingमतदान