शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड; त्यांच्याकडे भविष्याचा विचार नाही'- PM मोदी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:25 IST

PM Modi Statement: 'चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे.'

Narendra Modi MP Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोपाळमधील सभेत लोकांना संबोधित करताना काँग्रेसला गंजलेले लोखंड म्हटले. तसेच, काँग्रेस (Congress) जिकडे गेली, त्या राज्याची नासधूस केली. पक्षाकडे भविष्याचा विचार नाही. विकासाच्या प्रत्येक प्रकल्पावर काँग्रेस टीका करते. भारताचे यश काँग्रेसला आवडत नाही. काँग्रेसला देशाला पुन्हा विसाव्या शतकात घेऊन जायचे आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

काँग्रेस राज्याची नासधूस करेलभोपाळमध्ये 'कर्त्यकर्ता महाकुंभ'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस राजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे रणनीती, कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात दीर्घकाळ राज्य केले, पण संसाधनांनी समृद्ध मध्य प्रदेशला काँग्रेसने आजारी बनवले. तरुणांनी मध्य प्रदेशला गहू उत्पादक राज्य म्हणून पाहिले आहे. तरुणांनी मध्य प्रदेशकडे शिक्षणाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पाहिले आहे. आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसला संधी मिळाली, तिथे काँग्रेसने नासधूस केली. आगामी काही वर्षे मध्य प्रदेशच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेश विकसित बनवण्याची हीच वेळ आहे, असंही मोदी म्हणाले.

हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पक्ष...पीएम मोदी पुढे म्हणाले की, अशा महत्त्वाच्या वेळी काँग्रेससारखा घराणेशाही पक्ष, हजारो कोटींच्या घोटाळ्यांचा इतिहास रचणारा पक्ष, व्होटबँक खुश करणार्‍या पक्षाला संधी मिळाली, तर मध्य प्रदेशाचे मोठे नुकसान होईल. काँग्रेसने लोकशाहीला कुटुंबव्यवस्था म्हटले. काँग्रेसचे राजकारण गरिबी आणि वंचितांवर फोफावते. ज्यांच्याकडून त्यांना मते मिळाली, त्यांनाच लाभ द्यायचा. आज जग भारताविषयी जे काही बोलले जाते, ते याआधीही बोलले गेले असते, पण काँग्रेस केवळ एका कुटुंबाचे गुणगान करण्यात व्यस्त राहिली. काँग्रेसने भारतातील भ्रष्ट व्यवस्थेचे पोषण केले. काँग्रेसने अशी व्यवस्था निर्माण केली की, व्यवस्थेने नेहमीच गरिबांना हात पसरवण्यास भाग पाडले. काँग्रेसने देशाला अन्न, वस्त्र, निवारा यात अडकवून ठेवले. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजप सरकार सतत काम करत आहे. 

गरिबांचे शेत काँग्रेससाठी फोटोसेशनचे मैदानकाँग्रेस अजूनही त्याच मानसिकतेत आहे. चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांना गरिबांचे काही देणं-घेणं नाही. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी ही झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे. गरीब शेतकऱ्याचे शेत काँग्रेससाठी फोटो सेशनचे मैदान बनले आहे. यापूर्वीही त्यांनी असेच केले होते, आजही ते तेच करत आहेत. महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे गर्विष्ठ मित्र हा कायदा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची विचारसरणी आजही बदललेली नाही, हे लोक खूप अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात. काँग्रेसला ना स्वतःला बदलायचे आहे ना देश बदलू द्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण