शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 18:25 IST

Madhya Pradesh Election: 'भाजपवाले म्हणतात, काँग्रेसने 70 वर्षात काय केले? काँग्रेसने संविधान वाचवले, लोकशाही वाचवली.'

Madhya Pradesh Election 2023: लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. या महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकी होणार आहेत, त्यामुळे नेत्यांचे दौरेही राज्यात वाढले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील सागरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'आम्ही 70 वर्षे संविधान वाचवले 'भाजपवर ताशेरे ओढत खर्गे म्हणाले, 'काँग्रेसने 70 वर्षात काय केले, हे भाजप नेहमी विचारते. आम्ही संविधान वाचवले, लोकशाही वाचवली. त्यामुळेच ते (नरेंद्र मोदी) पंतप्रधान झाले. तुम्ही ईडीचा धाक दाखवला आणि राज्यात तुमचे सरकार स्थापना केले. कर्नाटक आणि मणिपूरमध्येही असेच केले गेले. जिथे भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, तिथे ते हेच काम करतात. संविधान बदलाचे प्रयत्न सुरू आहे, पण असे होणार नाही. 140 कोटी जनता तुमच्यासमोर उभी असेल,' अशी टीका खर्गेंनी यावेळी केली. 

'मध्य प्रदेश सरकार बेकायदेशीर'खर्गे पुढे म्हणाले की, 'मध्य प्रदेशातील सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. भाजपने आमचे आमदार फोडले. काँग्रेसने स्वतःच्या तत्त्वांवर सरकार स्थापन केले आहे. मी वचन देतो की काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. स्वयंपाकाचा घरगुती गॅस 500 रुपयांना मिळेल. महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल. 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. याशिवाय राज्यात जातीय जनगणनाही करुन दिली जाईल,' अशी आश्वासने खर्गेंनी यावेळी दिली.

निवडणुकीत भाजपला संत रविदासांची आठवण येते'नरेंद्र मोदींनी सागर येथे पूज्य संत रविदास यांच्या 100 कोटी रुपयांच्या अनुसूचित जातींच्या मंदिराची पायाभरणी केली, परंतु दिल्लीत मूर्तीची मोडतोड करण्यात आली. भाजपला संत रविदासांची फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवण येते. मोदीजी गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहेत, तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान गेली 18 वर्षे राज्यावर राज्य करत आहेत. यांना फक्त निवडणुकीच्या वेळीच रविदासांची आठवण झाली,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक