मध्य प्रदेश: आपच्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल; 'वो लड़का आंख मारे…' वर डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:17 IST2023-11-23T14:16:44+5:302023-11-23T14:17:43+5:30
दमोह विधानसभा मतदारसंघातून आपच्या उमेदवार चाहत पांडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेश: आपच्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल; 'वो लड़का आंख मारे…' वर डान्स
मध्य प्रदेशमध्ये सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आपची महिला उमेदवार बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेटकऱ्यांच्यारही त्यावर उड्या पडत आहेत. परंतू, हा व्हिडीओ तिला बदनाम करण्याच्या हेतूने व्हायरल करण्यात आला आहे.
दमोह विधानसभा मतदारसंघातून आपच्या उमेदवार चाहत पांडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चाहत या आंख मारे या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. एक मिनिट आणि सहा सेकंदांचा हा व्हिडीओ कधीचा आहे हे समजलेले नाहीय परंतू तो निवडणूक काळात मुद्दाम व्हायरल करण्यात आला आहे.
कोणाला हा डान्स आवडला आहे तर काहीजण त्यावर टीका करत आहेत. काही इंटरनेट युजर्सनी चाहत पांडे ही राजकारणात येण्यापूर्वी छोट्या पडद्यावर अभिनय करायची असा दावा केला आहे. यामुळे तिच्या डान्स करण्यावर काही आक्षेप असण्याचे कारण नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरा गट सार्वजनिक आयुष्यात हे योग्य नाहीय, असे म्हणत आहे.
आम आदमी पार्टी विधायक उम्मीदवार दमोह
— Harsh Vyas 🇮🇳 (@Harsh2147) November 22, 2023
( मध्य प्रदेश )
कांगियो और आपियों के पास भी गजब के नचनिए हैं....😂😁😄😁😂
#चाहत_पांडेयpic.twitter.com/zzvfA7sGky
अभिनेत्री चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. वयाच्या १७ व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तेनालीरामन, राधा कृष्णन, सावध इंडिया, नागिन-2, दुर्गा-माता की छाया, अलादीन आणि क्राइम पेट्रोल यासह अनेक मालिकांमध्ये ती दिसली आहे. सध्या ती 'नाथ जेवर या जंजीर' या टीव्ही शोमध्ये महुआची भूमिका साकारत आहे.