शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या खात्यात पैसे, मामाच्या झोळीत मते..; ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 05:39 IST

मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली होती . सात जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती.

कमलेश वानखेडेनागपूर : मध्य प्रदेशात सत्ता वापसीचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मार्ग कठीण होता. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सत्ता परिवर्तनाचा नारा दिला होता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी 'लाडली बहना' योजना जाहीर करत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १२५९ रुपये टाकण्यास सुरुवात केली. 'बहना'च्या खात्यात दरमहा पैसे येऊ लागले आणि 'मामांची ' झोळी मतांनी भरत गेली. 

मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली होती . सात जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. 2 कोटी 72 लाख 33 हजार महिला मतदारांवर फोकस करीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना जाहीर केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील प्रत्येक महिलेला लखपती करू, प्रत्येक महिलेला महिन्याचे दहा हजार रुपये कमवता येतील एवढे सक्षम करू अशी घोषणा करत महिला मतदारांना गळ घातली. एवढेच नव्हे तर लाडली बहना योजनेतून ज्या महिलांची नावे सुटली आहेत त्यांचीही नावे समाविष्ट केली जातील अशी घोषणा करीत संपूर्ण महिला शक्तीचे मन आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. मामांची ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली.

ही ठरली महत्त्वाची कारणे...

ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने शक्ती पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यासह ३९ स्टार प्रचारक नेते मैदानात उतरले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतः १६० रोडशो केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रचारात जीव ओतला.

महाकौशल या विभागातील ३८ पैकी २४ जागा गेल्यावेळी काँग्रेसने जिंकल्या होत्या. या जागा परत मिळवण्यावर भाजपने फोकस केला. बहुतांश जागा जिंकत सामना फिरवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला. 

कमलनाथ यांनी एकाकी किल्ला लढविला. छिंदवाडा जिल्ह्यातील सर्व सात जागा जिंकून कमलनाथ यांनी आपले प्रभुत्व सिद्धही केले. पण त्यांचे 'मुख्यमंत्री' कार्ड त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवू शकले नाही.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेसshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान