शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:11 IST

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते.

भोपाळ - कर्नाटक विधानसभेचा निकाल अखेर हाती आला असून यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने राज्यासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु कर्नाटकच्या विजयानंतरही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना वेगळीच चिंता लागली आहे. भाजपा कर्नाटकात घोडेबाजार करू शकते याची भीती कमलनाथ यांना आहे. 

या निकालावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. मात्र पराभवानंतरही भाजपा कर्नाटकात घोडेबाजार करू शकते. फोडाफोडीचे राजकारण करत भाजपा सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकते असंही त्यांनी म्हटलं. कमलनाथ यांच्या भीतीचे कारण जवळपास ३ वर्षापूर्वी मध्य प्रदेशात घडलेल्या राजकीय घटनांमुळे आहे जेव्हा कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात यश मिळाल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार बनवले परंतु अवघ्या १५ महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसचे २४ हून अधिक आमदार फुटले आणि कमलनाथ सरकारने बहुमत गमावले. विश्वासदर्शक ठरावात अपयश आल्याने कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर राज्यात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले. भाजपा घोडेबाजार करून सरकार बनवते असा आरोप काँग्रेस तेव्हापासून करतेय. 

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते. कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाचे २ प्रमुख दावेदार आहेत. त्यात एस सिद्धारमैया आणि डी शिवकुमार, या दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरूनही मतभेद चव्हाट्यावर आले होते. मुख्यमंत्रिपदावरूनही या दोन्ही नेत्यांमध्ये चढाओढ आहे. अशीच स्थिती २०१८ मध्ये मध्य प्रदेशात होती. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. त्यात हायकमांडने कमलनाथ यांची मुख्यमंत्रिपदाची निवड केली, ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा झटका बसला आणि त्यांनी दीड वर्षातच पक्षाला रामराम केला. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा