शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला : पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:20 IST

मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

पिपरिया (मध्य प्रदेश) : काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. मात्र, आमच्या सरकारने त्यांचा नेहमीच सन्मान केला, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेसने कधीच आदिवासींचे योगदान मान्य केले नाही. मात्र, भाजप सरकारने त्यांना गौरविले, असे ते म्हणाले. 

भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मोदी म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला, मात्र, आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच एक आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती होऊ शकली. मी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो तर देशात आगडोंब उसळेल, असेे काँग्रेस म्हणत आहे. देशाला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे हे विरोधी इंडिया आघाडी ठरवू शकत नाही. त्यामुळे ते असे म्हणत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. 

ते देशाचे संरक्षण करू शकत नाहीत...‘फिर एक बार, मोदी सरकार’चा देशभर गजर सुरू आहे. विरोधी आघाडी इंडियाचा घटक असलेल्या एका पक्षाने निशस्त्रीकरणाचे आश्वासन दिले आहे. आमच्या देशाच्या रक्षणासाठी आमच्याकडे अण्वस्त्रे असणे आवश्यक आहे. जे वेगळे सूर लावत आहेत ते भारताचे संरक्षण करू शकत नाहीत. मोदींचे स्वत:चे कोणतेही स्वप्न नाही. तुमची स्वप्ने साकार करणे हेच माझे स्वप्न आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती