शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात आदिवासी तरुणावर भाजप आमदाराच्या मुलाचा गोळीबार, आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:50 IST

काही दिवसांपूर्वी आदिवासी व्यक्तीवर भाजप कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोळीबाराची घटना समोर आली.

काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशात एका आदिवासी व्यक्तीच्या अंगावर भाजपच्या कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिंगरौली येथे एका आदिवासी तरुणावर गोळीबाराची घटना घडली आहे. सिंगरौलीचे भाजप आमदार रामलल्लू वैश यांचा मुलगा विवेक वैश याने त्या तरुणावर हा जीवघेणा हल्ला केला. सध्या पीडित आदिवासी तरुण धोक्याबाहेर आहे, मात्र आरोपी विवेक वैश फरार असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

जखमी तरुणाची प्रकृती स्थिरहे प्रकरण सिंगरौली जिल्ह्यातील मोरबा येथील आहे. सिंगरौलीचे भाजप आमदार रामलल्लू वैश यांचा मुलगा विवेक वैश याने किरकोळ वादातून आदिवासी तरुण सूर्या खैरवारवर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने सूर्या खैरवार याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता बुढी माई मंदिराजवळ घडली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठले.

घटनेला चार तास उलटूनही पोलिस एफआयआर लिहिण्यास टाळाटाळ करत होते. याउलट आरोपीचे नाव न सांगण्याचा पीडत तरुणावर दबाव टाकला. यानंतर या गंभीर घटनेबाबत स्थानिकांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणल्यानंतर पोलिसांनी कलम 307, 25 कलम लावले आणि आमदार मुलावर गुन्हा दाखल केला.

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीकाभाजप आमदार रामलल्लू वैशचा मुलगा विवेक याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही त्याच्यावर वन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विचारले की, या घटनेतील पीडितेचेही पाय धुणार का? आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवणार का? सिधी येथील आदिवासीच्या अंगावर लघवी केल्याप्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला होता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFiringगोळीबारBJPभाजपाMLAआमदारCrime Newsगुन्हेगारी