शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
2
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
3
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
4
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
5
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
6
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
7
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
9
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
10
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
11
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
12
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
13
महिला वाढल्या, कंपन्यांच्या चुका अन् खर्चही कमी झाला; 5000 कंपन्यांच्या डेटातून खुलासा
14
"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
15
Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, मात्र चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पटापट चेक लेटेस्ट रेट
16
मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
17
सावधान! ChatGPT आणि Geminiला चुकूनही विचारू नका 'या' गोष्टी; बसू शकतो मोठा फटका!
18
SIP Calculator: दर महिन्याला ₹५,००० जमा केले तर २० वर्षांमध्ये किती फंड तयार होईल; पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
VIDEO: दिल्लीच्या मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई; बेकायदेशीर बांधकामं पाडली, दगफेकीचाही प्रकार
20
"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 21:21 IST

Ujjain Mahakal Temple Wall Collapse: मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उज्जैनमध्ये मोठी दुर्घटना घडली.

Ujjain Mahakal Temple Wall Collapse: मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळला असला तरी नागरिकांना  मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी उज्जैनमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ बांधलेली भिंत चिखलामुळे कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे.

माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेतले. भिंत कोसळल्याने काही जण जखमीही झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेरिटेज वास्तू म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या महाकाल मंदिराजवळील महाराज वाडा शाळेची भिंत कोसळली.

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने इंदूर-उज्जैन, जबलपूर आणि ग्वाल्हेर विभागात पावसाचा इशारा दिला आहे. IMD च्या मते, मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी ४२.६ इंच पाऊस झाला आहे. वास्तविक, हवेच्या वरच्या भागात चक्रीवादळ तयार झाले असून, त्यामुळे उत्तर मध्य प्रदेशात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. विशेषत: इंदूर, उज्जैन, रेवा, ग्वाल्हेर आणि सागरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :ujjain-pcउज्जैनTempleमंदिरAccidentअपघातDeathमृत्यू