शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग! बलात्कारानंतर ती मदतीसाठी ८ किमी भटकत राहिली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:18 IST

आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्कउज्जैन : एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी दांडी आश्रमाजवळ ही मुलगी अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. ती सुमारे संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ८ किलोमीटर चालल्याने दिसत आहे. 

आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली, याबाबत तिला काही सांगता येत नाही. अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे. तिच्या बोलण्यावरून मुलगी प्रयागराजची रहिवासी असावी, असा अंदाज पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी वर्तवला.

ऑटोचालक ताब्यातसीसीटीव्ही फुटेजमध्ये हटकेश्वर रोडवर एक ऑटोरिक्षा दिसली, ज्यामध्ये पीडितेसोबत एक व्यक्तीही दिसत होती. फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मंगळवारी रात्री ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे.

एसआयटीद्वारे तपासया प्रकरणाची बालहक्क आयोगाने दखल घेतली असून पोक्सो कायद्यांतर्गत तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शर्मा यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश