शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! २ चिमुकल्यांनी डोळ्यादेखत आई-वडील गमावले; भीषण अपघातात जवान-पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 17:37 IST

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात विशेष सशस्त्र दल (SAF)-१४ बटालियनचा एक जवान आणि त्याच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने त्यांचा मुलगा आणि मुलगी बचावली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जवान आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी बस ताब्यात घेतली असून अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त  होत आहे. अनिरुद्ध सिंग असे मृत जवानाचे नाव आहे.

माहितीनुसार, मेहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्‍हाडजवळ अचानक एक मोठा आवाज आला अन् स्थानिकांना धक्का बसला. आवाज ऐकताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बस आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाल्याचे कळताच बघ्यांनी घटनेची माहिती  पोलिसांना दिली. लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता कारमध्ये चार जण होते. कारमध्ये महिला आणि पुरुषाव्यतिरिक्त दोन मुलेही होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार ताब्यात घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढले. पोलिसांनी तात्काळ चौघांनाही ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. पण, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा आणि मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पती-पत्नीचा मृत्यू दरम्यान, कारमध्ये मृत व्यक्तीचे ओळखपत्र सापडले आहे. त्यावरून मृत व्यक्ती विशेष सशस्त्र दलात कार्यरत असल्याचे उघड झाले. अनिरुद्ध सिंग असे मृत जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी बस देखील ताब्यात घेतली. हा अपघात होताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोकांनी गाडीची अवस्था पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.  

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूAccidentअपघात