मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या रोड शोमध्ये लोकांचा मोठा जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 10:01 IST2023-08-01T10:00:59+5:302023-08-01T10:01:37+5:30

"शिवराज भैया का ये कहना, सशक्त बने मध्य प्रदेश की बहना" अशा घोषणा असलेले फलक लावले होते. बहिणींनीही त्यांना राखी भेट दिली.

A large crowd of people at Chief Minister Shivraj Singh Chouhan's road show | मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या रोड शोमध्ये लोकांचा मोठा जनसमुदाय

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या रोड शोमध्ये लोकांचा मोठा जनसमुदाय

बारगाव – कटनी जिल्ह्यातील बारगावात विकास पर्व यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या रोड शो मध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव केला जात होता. लोकांकडून पुष्पहार घालून चौहान यांचे स्वागत केले जात होते. नागरिकांनी घरांच्या छतावर उभे राहून रस्त्यावर येणाऱ्या रोड शोवर पुष्पवृष्टी केली. इतकेच नाहीतर बहिणींनी कलश यात्रा काढून मुख्यमंत्री भावाला स्मृतीचिन्ह भेट दिले.

रोड-शोमध्ये मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची कंत्राटी कर्मचारी संघटना, अतिथी शिक्षक संघटना, स्वच्छताग्रही संघटना, रोजगार सहाय्यक संघटना, सरपंच सचिव संघटना, सहकारी कर्मचारी संघटना, नवीन व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण संघ, राणी दुर्गावती बहुउद्देशीय सहकारी संस्था, सह विविध संघटनांनी स्वागत केले. “शिवराज भैया का ये कहना, सशक्त बने मध्य प्रदेश की बहना" अशा घोषणा असलेले फलक लावले होते. बहिणींनीही त्यांना राखी भेट दिली.

रोड शोमध्ये राज्याचे वित्त, वाणिज्य कर, नियोजन व सांख्यिकी मंत्री तथा जिल्ह्याचे प्रभारी जगदीश देवरा, खासदार व्ही.डी. शर्मा, आमदार संजय पाठक, संदीप जैस्वाल आणि प्रणय प्रभात पांडे, इतर लोकप्रतिनिधी व मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित होती.

 

Web Title: A large crowd of people at Chief Minister Shivraj Singh Chouhan's road show