शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

६५ वर्षांचा रुग्ण पडला तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात, लगट करू लागला, घातली लग्नाची मागणी, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 20:27 IST

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूर येथून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ६५ वर्षांचा एक ज्येष्ठ नागरिक २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. एकतर्फी प्रेमातून तो दररोज कुठलं ना कुठलं निमित्त काढून तिचा पिच्छा पुरवू लागला. अखेरीस वैतागलेल्या महिला डॉक्टरनं पोलिसांकडे तक्रार दिली.

मध्य प्रदेशमधील इंदूर येथून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ६५ वर्षांचा एक ज्येष्ठ नागरिक २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. एकतर्फी प्रेमातून तो दररोज कुठलं ना कुठलं निमित्त काढून तिचा पिच्छा पुरवू लागला. अखेरीस वैतागलेल्या महिला डॉक्टरनं पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या रंगेल म्हाताऱ्याला अटक केली आहे. तसेच पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. 

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आहे. आरोपी सलाउद्दीन खान हा आजारी होता. त्यावर उपचार करून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो एमवाय रुग्णालयात गेला होता. त्यावेळी एका २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले होते. त्यानंतर सलाउद्दीन खान याला तिच्याविषयी आकर्षण वाटू लागलं. तो कुठला ना कुठला बहाणा बनवून तो त्या डॉक्टरकडे जाऊ लागला. सुरुवातीला या महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र एकेदिवशी या रुग्णाने हद्दच केली. त्याने या महिला डॉक्टरला प्रेमपत्र पाठवून लग्नाला मागणी घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार दिली. 

संयोगिताजंग पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीष पटेल यांनी सांगितले की, आरोपी वृद्ध महिला डॉक्टरला सातत्याने त्रास देत होता. त्याने महिला डॉक्टरला प्रेमपत्रही लिहिलं. आरोपीची मन:स्थिती बरोबर दिसत नाही आहे. डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीने डॉक्टरला पहिल्यांदा रुग्णालयात पाहिल्यापासून तो तिच्या मागे लागला होता. तसेच तो कुठला ना कुठला बहाणा बनवून सदर महिला डॉक्टरशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपdocterडॉक्टर