आदि शंकराचार्य यांचा १०८ फूट उंचीचा उभारला पुतळा; मुख्यमंत्री चौहान करणार गुरुवारी अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:39 IST2023-09-17T13:05:42+5:302023-09-17T13:39:14+5:30
प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी बाल शंकराचार्य यांचे एक चित्र तयार केले होते

आदि शंकराचार्य यांचा १०८ फूट उंचीचा उभारला पुतळा; मुख्यमंत्री चौहान करणार गुरुवारी अनावरण
खंडवा - मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर येथे डोंगररांगेत वसलेल्या एकात्मता धाममध्ये आदि गुरू शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते येत्या २१ सप्टेंबर रोजी अनावरण होणार आहे.
विष्णु सहस्रनामावरील रचना ओंकारेश्वरातच रचली गेली.
आदि शंकराचार्यांची विद्येची भूमी असलेली ओंकारेश्वर देशभरातून जमलेल्या सन्यासांच्या मंत्रोच्चाराने पवित्र झाली आहे. येथे आचार्य शंकर लिखित भाष्यग्रंथांचे १०८ तास पारायण सुरू आहे. १८ सप्टेंबर रोजी 'स्टॅच्यू ऑफ वननेस' या १०८ फूट उंच पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून साधू-संत इथं येणार आहेत. याशिवाय देशभरातील विविध मठांमधून जमलेले ३२ साधू आचार्य शंकर यांनी लिहिलेल्या भाष्यांचे पठण प्रतिमास्थळी करत आहेत. आद्य शंकराचार्यांनी ओंकारेश्वरमध्येच विष्णुसहस्त्रनामावर ग्रंथ लिहिलं होतं, ग्रंथ करण्यासाठी ३२ साधूंचे सहा टीम आहेत, प्रत्येक टीम दिवसातून २ तास पाठ करतो. या ३२ वैदिक विद्वानांच्या टीमचे नेतृत्व सांस्कृतिक एकात्मता ट्रस्टचे विश्वस्त आचार्य शंकर आणि आदिशंकर ब्रह्म विद्यापीठ, उत्तरकाशीचे आचार्य करत आहेत.
प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी बाल शंकराचार्य यांचे एक चित्र तयार केले होते. त्या धर्तीवर सोलापूर येथील प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आदि शंकराचार्यांचा १०८ फूट उंच पुतळा बनविला आहे. या पुतळ्याचा पाया ७५ फूट उंचीचा असून, पुतळ्याचे वजन १०० टन आहे.