शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम न करणाऱ्यांनो सावधान! जागतिक आरोग्य संघटनेचा 1.4 अब्ज लोकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:45 IST

श्रीमंत देशांमध्ये स्मृतीभ्रंश, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार व्यायामाच्या अभावामुळे वाढत आहेत.

पॅरिस- सकाळी उठायचा कंटाळा त्यानंतर व्यायामाचा कंटाळा असं तुमचं आयुष्य असेल तर सावधान! तुम्ही आजिबातच व्यायाम करत नसाल तर तुमचं आयुष्य धोक्यात असेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ या संस्थेने दिला आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये लोकांच्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा समावेशच नाही त्यामुळे प्रत्येक तीन महिलांमधील एका महिलेस व चार पुरुषांमधील एका पुरुषाला हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यांचा धोका निर्माण होईल अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. जर व्यायाम केला नाही तर या रोगांचा सामना करावा लागेल असा 1.4 अब्ज प्रौढांना इशारा देण्यात आलेला आहे.अपुऱ्या शारिरीक हालचालींमुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे मानसिक आरोग्य व जीवनाच्या गुणवत्तेवर (क्वालिटी ऑफ लाईफ) परिणाम होईल असे द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नल या जगप्रसिद्ध आरोग्य नियतकालिकामध्ये लेखात म्हटले आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने एका आठवड्याभरात प्रौढ व्यक्तीने मॉडरेट इन्टेसिटी म्हणजे मध्यम तीव्रतेचे उदाहरणार्थ ब्रिस्क वॉकिंग, पोहणे, कमी वेगात सायकल चालवणे अशा प्रकारचे व्यायाम 150 मिनिटे तरी करायला हवेत. किंवा विगरस इन्टेन्सिटी (जोमदार ) व्यायाम 75 मिनिटे करायला हवेत. यामध्ये धावणे आणि सांघिक खेळांचा समावेश होतो.

2016 साली जगातील 168 देशांमधील 1.9 अब्ज लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये लोकांच्या शारिरीक हालचाली म्हणजे व्यायामाच्या स्थितीमध्ये 2001 पासून फारसा फरक पडला नसल्याचे स्पष्ट झाले. जगातील 1.4 अब्ज प्रौढ लोक म्हणजे एकूण प्रौढांच्या एक चतुर्थांपेक्षा जास्त प्रौढ लोक शारीरिकदृष्ट्या फारसे कार्य़रत नाहीत. लोकांनी व्यायाम करावा यासाठी प्रयत्न करण्यात आपण कमी पडलो आहोत असे मत डब्ल्यूएचओच्या या अभ्यासाचे प्रमुख लेखक रेगिना गुथोल्ड यांनी व्यक्त केले. लोकांच्या स्थितीमध्ये काहीच प्रगती झाली नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

श्रीमंत देशांमध्ये स्मृतीभ्रंश, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार व्यायामाच्या अभावामुळे वाढत आहेत. गुथोल्ड यांच्यामते श्रीमंत देशांमधील जीवनशैलीचा व रोगांचा एक संबंध आहे. सतत चार भिंतींच्या आत राहाणे, ऑफिसमध्ये जास्त काळ काम करणे, जास्त उष्मांक असणाऱ्या अन्नाची सहज उपलब्धता, कमी व्यायाम असा एक स्पष्ट जीवनशैलीप्रकार शहरीकरणामुळे आलेला आहे.जसजसे देशाचे शहरीकरण होत जाते तसे लोक शेतीसारखे शारीरिक हालचालीचे व्यवसाय सोडून बैठ्या जीवनशैलीच्या शहरी वातावरणात जातात त्यामुळे त्याची नंतर भरपाई करावीच लागते असे त्या म्हणाल्या.कुवैत, अमेरिकन सामोआ, सौदी अरेबिया, इराक या देशातील एकूण प्रौढांपैकी निम्म्याहून अधिक प्रौढ शारीरिकदृष्ट्या पुरेसे कार्यरत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स