शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे घटले आयुष्य; आशिया-आफ्रिकेला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:08 IST

२०१६ साली गोळा केलेल्या जगभरातील माहितीचा उपयोग ग्लोबल बर्डन आॅफ डिसिज या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर आणि लोकांचे आयुष्यमान यांचा सहसंबंध तपासणारा प्रत्येक देशामध्ये असा पहिल्यांदाच अभ्यास करण्यात आला.

टेक्सस-हवा फुकट असली तरी दुषित हवेमुळे माणसाला मोठी किंमत चुकवावी लागते. जगभरामध्ये वायू प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे आरोग्यावर होणारा परिणाम. त्यामुळे जगातील सर्व लोकांचे आयुष्य सरासरी एका वर्षाने घटल्याचे धक्कादायक वास्तव शास्त्रज्ञांना आपल्या निरीक्षणातून दिसले आहे. आशिया आणि आफ्रिकेतील लोकांचे आयुष्य इतर देशांतील नागरिकांपेक्षा अधिक धोक्यात असल्याच निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. २०१६ साली गोळा केलेल्या जगभरातील माहितीचा उपयोग ग्लोबल बर्डन आॅफ डिसिज या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर आणि लोकांचे आयुष्यमान यांचा सहसंबंध तपासणारा प्रत्येक देशामध्ये असा पहिल्यांदाच अभ्यास करण्यात आला. (पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेत तरंगणारी सुक्ष्म प्रदूषके).

वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्याशी थेट संबंध असतो. फुप्फुसं आणि हृद्याचे अनेक विकार यामुळे होतात. वायूप्रदुषणामुळे आजार होतात आणि मृत्यूही संभवत असला तरी त्याचा आयुष्यमानावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास टेक्सस विद्यापीठातील जोशुआ अप्टे हे पर्यावरण तज्ज्ञ व त्यांचा चमू करत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने पीएम २.५ ते १० मायक्रोग्रॅमपर्यंत असणेच योग्य असल्याचे सुचविले आहे. जगातील कॅनडासारख्या काही श्रीमंत देशांनी हवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र गरिब देशांमध्ये प्रदूषण भरपूर असल्याचे त्यांच्या अभ्यासात आढळले. भारतामध्ये हवेचे प्रदूषण सर्वात जास्त झाल्याचेही या निरीक्षणामध्ये दिसून आले आहे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणHealthआरोग्य