शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाल, व्यायाम करा नाहीतर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 14:47 IST

जे लोक आजारी आहेत, रुग्णालयात आहेत किंवा बेडरेस्ट घेत आहेत अशा लोकांना रक्तात साखरेची पातळी वाढण्याचा अधिक धोका आहे असे यातून सिद्ध झाले आहे. जर मोठ्या काळासाठी लोक जर हालचाल कमी करणार असतील तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करावेच लागेल

ओंटारियो- जे लोक दररोज पुरेशी हालचाल, व्यायाम करत नाहीत त्यांच्या रक्तामधील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो असे नव्या संशोधनामधून सिद्ध झाले आहे. प्रिडायबेटिस गटातील सामान्य पातळीपेक्षा जास्त वजन असलेल्या लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. दिवसाला १००० पावलांपेक्षा जास्त हालचाल न करता २ आठवडे राहिल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासपाहाणीत धक्कादायक निकाल पाहावयास मिळाले. दोन आठवड्यांमध्ये या लोकांच्या रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली होती तसेच दैनंदिन जीवनाप्रमाणे हालचाल करायला सुरुवात केल्यानंतरही काही लोकांना सामान्य स्थितीत येण्यास वेळ गेला. या अभ्यासावरुन एक निबंध जर्नल्स आॅफ जेरेंटोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आम्हाला वाटत होते हालचाल कमी झाल्यावर या लोकांच्या रक्तशर्करा पातळीत वाढ होईल पण त्यांनी पूर्वीसारखी हालचाल सुरु करण्यात आल्यावरही सामान्य पातळीवर येता आलं नाही हे आमच्यासाठी धक्कादायक होतं असे या शोधनिबंधाचे मुख्य लेखक ख्रिस मॅकग्लोरी यांनी सांगितले. ते ओंटारियोतील हॅमिल्टनमध्ये असणाऱ्या मॅकमास्टर विद्यापिठामध्ये किन्सिओलॉजी विभागामध्ये संशोधन करत आहेत. जे लोक आजारी आहेत, रुग्णालयात आहेत किंवा बेडरेस्ट घेत आहेत अशा लोकांना रक्तात साखरेची पातळी वाढण्याचा अधिक धोका आहे असे यातून सिद्ध झाले आहे. जर मोठ्या काळासाठी लोक जर हालचाल कमी करणार असतील तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करावेच लागेल.

अमेरिकेत ८. ४ कोटी लोक सध्या प्रिडायबेटिक स्थितीमध्ये आहेत. अशी माहिती शोधनिबंधाचे सहलेखक स्टुअर्ट फिलिप्स यांनी दिली. प्रिडायबेटिक स्थितीतील लोकांना जर आपले आरोग्य सांभाळायचे असेल आणि भविष्यामध्ये  होणारा त्रास कमी करायचा असेल तर योग्य प्रमाणात हालचाल (व्यायाम), आहारात बदल आणि गरज असेल तर औषधांची मदत घेणे योग्य ठरेल असे मॅकग्लोरी यांनी निष्कर्ष काढला आहे. यामुळे प्रौढ व्यक्तींनी दैनंदिन जीवनामध्ये पुरेशी हालचाल व व्यायाम यांना आवर्जून स्थान दिले पाहिजे असे तज्ज्ञ आणि डॉक्टर्स सांगतात.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह