शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तणावापासून लांब राहण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 09:38 IST

तणावापासून दूर राहायचं असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करणं उपयुक्त ठरेल. 

मुंबई- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये तणाव आणि डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. कामाच्या वाढत्या ताणाचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम तर होतोच पण यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलतात. आपण सकाळचा नाश्ता,दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण चुकवलं तर त्याऐवजी बाहेरचं जंक फूड खातो. हे बाहेरचे पदार्थ खाताना काहीवेळासाठी चांगलं वाटतं पण जंक फूड, बेकरी फूड आणि जास्त सारखयुक्त पदार्थ आपल्यात नकारात्मक भावना वाढवत असतात. यामुळेच व्यक्तीच्या आयुष्यात तणाव वाढतो. त्यामुळे तणावापासून दूर राहायचं असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करणं उपयुक्त ठरेल. 

1- चॉकलेटचॉकलेट सगळ्यांनाच आवडतं असं नाही, पण चॉकलेट स्ट्रेस दूर करण्यासाठी मदत करतं. चॉकलेटमध्ये असणारं फिनाइलेथाइलामाइन तत्व डोक्याला आराम देतं. चॉकलेटमध्ये हाय फ्लेवनॉल असल्याने सौदर्यात भर पाडतं. पण योग्य प्रमाणात चॉकलेट खाणंच फायद्याचं आहे. त्याचा अतिरेकही होऊ नये. 20 ग्रॅम चॉकलेटमध्ये 150 कॅलेरीज असतात. ज्यामुळे वजनही वाढतं. 

2- अकरोडराग शांत करण्यासाठी अकरोड फायद्याचं आहे. अकरोडमध्ये एल-आर्जिनायन असते, जे नायट्रिक ऑक्साइडमध्ये बदलतं. नायट्रिक ऑक्साइड रक्तवाहिन्यांना शांत करण्यास मदत करतं. 

3- ओटमील-तुमचा खराब मूड चांगला करण्यासाठी तुम्ही आहारात ओटमीलचा वापर नक्की करा. ओट्समध्ये सगळ्यात जास्च कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे शरीरात सेरोटिन मिळतं. सेरोटिन मूड चांगला करण्याचं काम करतं. मनाला शांती व आराम मिळतो. ओट्समध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील कॅलेरीज न वाढता पोट भरलेलं वाटतं. 

4- ब्लूबेरी- स्ट्रेस घासविण्यासाठी ब्लूबेरीचा समावेश आहारात आवर्जून करा. ब्लूबेरीमध्ये योग्य प्रमाणात अॅन्टीऑक्सिडेंट असतं जे त्वचेतील कॉलेजनला व्यवस्थित ठेवतं. ब्लूबेरीतील पोटॅशियम ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यात मदत करतो त्यामुळे सोप्या पद्धतीने स्ट्रेस रिलीज होतं. 

5- ताजे मासे- 

आठवड्यातील काही दिवस ताजे मासे खाल्ल्याने मन शांत राहतं. माश्यांमध्ये असणारं आमेगा 3 फॅटी अॅसिड तणावाशी लढण्याची क्षमता वाढवतं. तसंच त्वचेला मऊ व तजेलदार बनवतं. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स