कोल्हापूरमधील भक्तिपुजानगर प्रतिबंधीत क्षेत्र आदेश मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:03 IST2020-05-02T18:02:41+5:302020-05-02T18:03:49+5:30
त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याने प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश उठवावा, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने भक्तीपूजानगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर या परिसरातील लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश उठविण्यात आला आहे.

कोल्हापूरमधील भक्तिपुजानगर प्रतिबंधीत क्षेत्र आदेश मागे
ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
कोल्हापूर :- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भक्तिपुजानगरमध्ये लागू केलेला प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज एका आदेशान्वये मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. भक्तिपुजानगरमधील 2 बाधीत रुगणांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याने प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश उठवावा, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने भक्तीपूजानगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर या परिसरातील लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश उठविण्यात आला आहे.