खरोसा ग्रामपंचायतीवर युवा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST2021-01-19T04:21:53+5:302021-01-19T04:21:53+5:30

: औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवा ग्रामविकास पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. या पॅनलने १३ पैकी ...

Youth Rural Development Panel dominates Kharosa Gram Panchayat | खरोसा ग्रामपंचायतीवर युवा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

खरोसा ग्रामपंचायतीवर युवा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

: औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवा ग्रामविकास पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. या पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय संपादन केला आहे. जनशक्ती ग्रामविकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतदारांनी अपक्षांना नाकारले आहे.

खरोश्यातील युवा ग्रामविकास पॅनलच्या पाच महिला आणि सहा पुरुष तर जनशक्ती ग्रामविकास पॅनलच्या केवळ दोन महिला विजयी झाल्या आहेत. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- खलिल शिकलकर, संयोगिता साळुंके, विशाल क्षीरसागर, शहाजी कांबळे, पद्मिनी नरवटे, मारुती राऊतराव, कामिनी खरोसेकर, अमर डोके, जयराज होगले, पुष्पा डोके, मीराबाई मुसांडे, कविता बिराजदार, भाग्यश्री जावळे यांचा समावेश आहे. युवा ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी पॅनल प्रमुख अजय साळुंके यांच्यासह मित्रमंडळाने परिश्रम घेतले.

अपक्ष उमेदवार माधव सांडूर यांनी दोन प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना दोन्ही ठिकाणहून पराभव पत्करावा लागला आहे. १९८८ पासून आजपर्यंत एकदाही खरोश्यात अपक्ष विजयी झाला नाही. जनशक्ती ग्रामविकास पॅनलचे खरपडे, तोडकर, सांगवे हे एकत्र येऊन पॅनल केले होते.

Web Title: Youth Rural Development Panel dominates Kharosa Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.