राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : बिदर रोडवरील उड्डाण पुलावर पुण्याकडे जाणाऱ्या एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने एका तरुणाला चिरडल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. या अपघातात तरुण जागीच ठार झाला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
पोलिसानी सांगीतले, उदगीर येथून पुण्याकडे निघालेल्या एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने (एम.एच. २४ ए.यू. १९१९) बिदर रोडवर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एकाला जाेराची धडक दिली. या अपघातामध्ये शिवाजी मोहन म्हैत्रे (वय ३९, रा. तादलापूर ता. उदगीर) हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेल्या तरुणाचा मृतदेह उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केला. याबाबत उदगीर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.