कर्णकर्कश हाॅर्नला सामान्यांसह आबाल-वृद्ध नागरिक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:26+5:302021-06-28T04:15:26+5:30

लातूर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहन जप्ती, दंडात्मक आणि खटले दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात नियमबाह्य आणि ...

Young and old citizens, including the common people, are disturbed by the hoarse horn! | कर्णकर्कश हाॅर्नला सामान्यांसह आबाल-वृद्ध नागरिक त्रस्त !

कर्णकर्कश हाॅर्नला सामान्यांसह आबाल-वृद्ध नागरिक त्रस्त !

लातूर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहन जप्ती, दंडात्मक आणि खटले दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात नियमबाह्य आणि कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात आली असून, अशा वाहनांचे कर्णकर्कश हाॅर्न आणि सायलेन्सर चक्क राेलरखाली ठेवत नष्ट करण्यात आले आहेत. त्याचबराेबर त्यांना एक ते दाेन हजारांचा दंड करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या काळात रस्त्यासह बाजारपेठेतील वाहनधारकांची गर्दी माेठ्या प्रमाणात ओसरली हाेती. आता पुन्हा गर्दी वाढत असून, स्टेटबाजी अन् कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीही वाढल्या आहेत.

तरुणाईत फॅन्सी हाॅर्नची क्रेझ...

लातुरात माेटारसायकलच्या फटाक्याच्या आवाजाने सामान्यांसह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक कमालीचे त्रस्त झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी केलेल्या कारवाईने हा त्रास्त मध्यंतरी कमी झाला हाेता. आता पुन्हा फॅन्सी हाॅर्न वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर आवर घालण्याची गरज आहे.

अनलाॅक प्रक्रियेनंतर फॅन्सी त्याचबराेबर म्युझिकल हाॅर्नची क्रेझ तरुणांमध्ये माेठ्या प्रमाणावर निर्माण हाेत आहे. यातून लहान बालकांच्या रडण्याच्या आवाजाचा हाॅर्न वाजवून भीती निर्माण केली जाते़ हे राेखण्यासाठी पाेलिसांनी पुन्हा कारवाईची माेहीम हाती घेतली पाहिजे.

कर्णकर्कश हाॅर्न वाजविला तर...

कर्णकर्कश हाॅर्न वाजवून सामान्यांसह इतरांना त्रास दिल्यास कारवाई केली जाते.

कलम १९९/ ११७ अन्वये कारवाई करून संबंधितांवर कारवाई करता येते.

लातुरातील अनेक प्रतिबंधित क्षेत्रात हाॅर्न वाजवून त्रास दिला जाताे.

प्रतिबंधित क्षेत्रात हाॅर्न वाजविणाऱ्यांवर पाचशे ते हजारांचा दंड करता येताे.

कायम बहिरेपणाचा धाेका...

कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडला तर त्यातून कायमचे बहिरेपण येण्याचा धाेका अधिक आहे.

४५ ते ५० डेसिबल्सपर्यंतचा आवाज सतत कानावर पडला तर कानांचे विविध आजार हाेतात. त्यातूनच कायम बहिरेपणा येण्याची अधिक शक्यता असते, असे मत डाॅ. ओमप्रकाश कदम यांनी व्यक्त केले.

हेडफाेनचा सतत आणि अतिरेकी वापर, कर्णकर्कश हाॅर्न हे कानांसाठी घातकच असते. त्यातून कानाच्या पडद्यावर परिणाम झाल्याने त्रास हाेण्याची शक्यता आहे.

कडक कारवाई करणार...

सध्याला बाजारपेठेत गर्दी वाढली असून, वाहनधारकांना शिस्त लावण्याबाबत शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. वाहतुकीचे नियम माेडणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. शिवाय, कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. सदरची माेहीम सुरूच राहणार आहे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

Web Title: Young and old citizens, including the common people, are disturbed by the hoarse horn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.