अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:48+5:302021-06-17T04:14:48+5:30
ज्या ठिकाणी वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा ...

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी
ज्या ठिकाणी वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी किंवा कृषी आकस्मिकता निधी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च करण्यात येईल. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीज जोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र सोबत जोडावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
वीज बिलाची पूर्वीची थकबाकी नसावी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणाऱ्या अर्जदारांकडे वीज बिलाची पूर्वीची थकबाकी नसावी तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीज संच मांडणीचा अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेविषयी माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याचे महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.