जिल्ह्यात योगदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:33+5:302021-06-22T04:14:33+5:30
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांत जागतिक योगदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. निरोगी राहण्यासाठी योग करणे गरजेचे ...

जिल्ह्यात योगदिन उत्साहात साजरा
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांत जागतिक योगदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. निरोगी राहण्यासाठी योग करणे गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. शहरातील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमध्ये आंतराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रमेश बिरादार, योग प्रशिक्षक डॉ. किरण सगरे, संदीप जाधव उपस्थित होते. डॉ. किरण पाटील यांनी प्राणायामविषयी मुलांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी रामेश्वर सगरे, हरिष गौड, सुयश बिरादार, सुजित बिरादार आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र, रणरागिणी कलापथक सेवाभावी संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सोमवारी योगा कार्यक्रम वीर हनुमान मंदिर ट्रस्ट, साळे गल्ली येथे पार पडला. यावेळी भाजपचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक ज्योती आवसकर, योग गुरु विष्णू भुतडा, प्रकाश भोकरे, कांचन वाघमारे, शेख इब्राहिम, दिगंबर सोनी, धम्मशीला सूर्यवंशी, आदींसह नागरिक उपस्थित होते.
दयानंद शिक्षण संस्थेमध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संदीप जगदाळे यांनी योगाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, सारिका राहुल बेतल, विश्वजित बेतल, नितीन कदम, जयमाला गायकवाड, योगेश पंडित, सुषमा शिंदे, अजिंक्य सोनवणे उपस्थित होते. या उपक्रमात संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सरचिटणीस रमेश बियाणी, डॉ. संतोष पाटील, डॉ. अशोक वाघमारे, डॉ. महेश बेंबडे, डॉ. नितेश स्वामी, डॉ. विक्रम चिंते, प्रा. कल्पना टप्पेकर, प्रा. ऋषिकेश मस्के, प्रा. निशिकांत सदाफुले, प्रा. सचिन पतंगे, विकास खोगरे, प्रीतम मुळे आदींसह विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला.
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये जागतिक योग दिन ऑनलाईन पद्धतीने आर्ट ॲाफ लिव्हींग, लातूर, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. वसुंधरा गुडे, उपप्राचार्य प्रा. मनोहर कबाडे, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, डॉ. बी. एम. गोडबोले, प्रा. रवींद्र सुरवसे, डॉ. भास्कर नल्ला रेड्डी, कार्यक्रम अधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे व डॉ. संजय गवई उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे म्हणाले, सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी प्राणायाम, योगासने आणि ध्यानसाधनेचा वापर केला तर आपले आरोग्य हे निरोगी आणि सुदृढ राहू शकेल, असेही ते म्हणाले.
श्री मारवाडी राजस्थान विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक जोशी, क्रीडा विभागप्रमुख अडाणे यांनी विद्यार्थ्यांना योगा, प्राणायामचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला क्रीडा मार्गदर्शक मुकेश बिराजदार, आशिष बाजपाई, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुश्री चेतना शाह, उपमुख्याध्यापक बंग, निपाणीकर, काजळे, होळे उपस्थित होते.