शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून

By राजकुमार जोंधळे | Updated: June 12, 2024 20:29 IST

बुधवारी सकाळी आढळला मृतदेह

निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील येलमवाडी येथील एका तरुणाचा अनसरवाडा रोडवर खून झाल्याची घटना बुधवारी समोर आली. विकास नामदेव थोरमोटे (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले की, निलंगा तालुक्यातील येलमवाडी येथील विकास नामदेव थोरमोटे हा तरुण शेतीसह ट्रॅक्टरचालक म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोणाला तरी फोनवर बोलताना शिवीगाळ करत तो घरातून बाहेर पडला. थाेड्या वेळानंतर त्याचा मोबाइल बंद दाखवत असल्याने घरच्या मंडळींनी निलंगा येथील नातेवाईक आणि मित्रांकडे चाैकशी करत शोध घेतला असता ताे आढळून आला नाही. बुधवारी सकाळी निलंगा शहरातील अशोकनगर भागातून अनसरवाडा जाणाऱ्या मार्गालगत विकास थाेरमाेटे याचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. घटनास्थळी नातेवाईक तातडीने दाखल झाले. त्यांनी निलंगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल हाेत पंचनामा केला. मयत विकासचे कपडे मृतदेहापासून दूरवर पडलेले आढळून आले. घटनास्थळी श्वान आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले हाेते. निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. येलमवाडी येथे सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन-चार संशयितांना पाेलिसांनी घेतले ताब्यात...

विकास थोरमोटे याच्या मोबाइल काॅल्सचा डेटा, लोकेशन आणि सीडीआर काढून पोलिस वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत. दरम्यान, तीन-चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. हा खून काेणत्या कारणाने झाला, याचाही शाेध पाेलिस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर