जगाला बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST2021-07-25T04:17:50+5:302021-07-25T04:17:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जगाच्या आरंभी काळापासूनच वेगवेगळे तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात झाली आहे. कुठे कुठे तर हुकुमशाहीव्दारे शस्त्राच्या ...

जगाला बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जगाच्या आरंभी काळापासूनच वेगवेगळे तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात झाली आहे. कुठे कुठे तर हुकुमशाहीव्दारे शस्त्राच्या बळाचा वापर जगावर राज्य करण्यासाठी केला आहे. परंतु, प्रत्यक्षात जगाला शस्त्राची नसून, बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज असल्याचे प्रतिपादन भन्ते पय्यानंद यांनी येथे केले.
आषाढ पौर्णिमेनिमित्ताने बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूरतर्फे आयोजित वर्षावास व धम्मदेसन कार्यक्रमात ते बोलत होते. भन्ते पय्यानंद म्हणाले, करुणेचे महासागर तथागत बुद्धांची शिकवण संपूर्ण मानव समूहासाठी असून, ती पूर्णतः सामाजिक आहे. सुविचार आणि नीतीमत्तेने जगाची उभारणी करणे हा सुखमय जगाचा पाया आहे. सुविचारानेच जगाची भविष्यकाळातील वाटचाल होणे अपेक्षित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही नैतिक विचारांची गरज जगाला आहे. तथागत बुद्ध हे जगातील सुविचाराचे प्रथम जनक असून, मानवजातीचे गुरु आहेत. तेव्हा बुद्धांचा सुविचारच जगाचा आधार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भन्ते यशकाश्यपायन महाथेरो, सेवानिवृत्त अधिकारी एम. एन. गायकवाड, गायिका सुमनताई जोगदंड, किशोर चक्रे, कुमार सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन भरत कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. अनिरुध्द बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग अंबुलगेकर, सुधाकर कांबळे, डॉ. अरुण कांबळे, परमेश्वर आदमाने, उदय सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.