स्मार्ट प्रकल्पासाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:47+5:302020-12-29T04:18:47+5:30

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी राधा चिरके यांच्या हस्ते झाले. उपस्थित लाभार्थ्यांना स्मार्ट प्रकल्पाची ओळख ...

Workshop for Smart Project | स्मार्ट प्रकल्पासाठी कार्यशाळा

स्मार्ट प्रकल्पासाठी कार्यशाळा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी राधा चिरके यांच्या हस्ते झाले. उपस्थित लाभार्थ्यांना स्मार्ट प्रकल्पाची ओळख व स्मार्ट प्रकल्पात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कृषी सहाय्यक अशोक आरणे यांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी करतांनाच्या अडचणी व भरावयाची माहिती याबद्दल मार्गदर्शन केले. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन दुरुगकर यांनी संकेत स्थळावर भरावयाची प्रपत्रे याची माहिती दिली. अर्ज सादर करणाऱ्या पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील कार्पोरेट, प्रक्रियादार, निर्यातदार, लघु व मध्यम उद्योजक, नोंदणीकृत खरेदीदार आदींचा समावेश आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी येथे सुरु असलेल्या कार्यशाळेत सहभागी होऊन स्मार्ट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे यांनी केले आहे.

Web Title: Workshop for Smart Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.