नळगीर ग्रामपंचायतीचे कार्य दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:32+5:302021-08-20T04:24:32+5:30

तालुक्यातील नळगीर येथे शनिवारी आयोजित वृक्षरोपण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह्याद्री- देवराई संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे, ...

Work direction of Nalgir Gram Panchayat | नळगीर ग्रामपंचायतीचे कार्य दिशादर्शक

नळगीर ग्रामपंचायतीचे कार्य दिशादर्शक

तालुक्यातील नळगीर येथे शनिवारी आयोजित वृक्षरोपण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह्याद्री- देवराई संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे, मुख्याधिकारी भारत राठोड, दिनेश सास्तूरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे विजय निटुरे, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चंदन पाटील, सरपंच मंजूषा उगिले, रमेश अंबरखाने, लक्ष्मणराव सोनवळे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाने गावचा विकास करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास निधी कसा खेचून आणावा तसेच त्या माध्यमातून गावातील रस्ते, नाली, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची सोय बरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केलेली वृक्षलागवड व त्याचे संगोपन हे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

यशस्वीतेसाठी ॲड. पद्माकर उगिले, उपसरपंच शंकर किवंडे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Work direction of Nalgir Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.