लोहारा येथे वीज पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:33+5:302021-06-01T04:15:33+5:30
उदगीर शहर व परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वा.च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. माळेवाडी, मलकापूर, ...

लोहारा येथे वीज पडून महिलेचा मृत्यू
उदगीर शहर व परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वा.च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. माळेवाडी, मलकापूर, बनशेळकी, शेल्हाळ, मादलापूर, सोमनाथपूर, लोणी, मोघा परिसरात पाऊण तास पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्याचे नागरिकांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे उदगीर शहरातील रस्त्यावरून किमान फुटभर पाणी वाहत होते. यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले. दरम्यान, महावितरणने वीजपुरवठा बंद केला होता.
तालुक्यातील लोहारा येथील बायडाबाई उर्फ सुनीता दयानंद कांबळे (३९) ही महिला दुपारी राजकुमार पाटील यांच्या शेतात शेळ्या चारत होती. तेव्हा त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.
औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात पाऊण तास पाऊस झाला. नागरसोगा येथील बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या शेतातील दोन गायींवर वीज पडल्याने त्या दगावल्या आहेत. त्यात त्यांचे १ लाख ४० हजारांचे नुकसान झाले.
दरम्यान, देवणी येथेही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामपूर्व शेतीकामात व्यत्यय आला आहे.