शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरे, हरणांचा उपद्रव वाढला; उगवलेली पिके खाऊन नष्ट केल्याने शेतकरी संकटात

By संदीप शिंदे | Updated: July 28, 2023 16:07 IST

यासोबतच गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

उदगीर : रानडुकरे व हरणांचे कळप शेतात पेरणी केलेले सोयाबीन व अन्य खरिपाची उगवण झालेली पिके खाऊन नष्ट करीत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या दोन्ही वन्यजीव प्राण्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नसल्यामुळे या दोन्ही प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊन खरिपाची पिके फस्त करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शिवाय गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा खरिपाच्या पेरणीसाठी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, उडीदचा पेरा कमी केला आहे. यामुळे सोयाबीनचा पेरा ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरून ४६ हजार हेक्टरपर्यंत गेला आहे. सोयाबीन व तूर पिकांची उगवण होऊन या पिकांची वाढ सुरू असतानाच रानडुकरे व हरणांचे कळप ही पिके फस्त करीत आहेत. कहर म्हणजे या दोन वन्य प्राण्यांसह गोगलगाय व बंदा नाणे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. हरणांचे कळप व रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उगवण झालेल्या पिकांची पाने खाऊन फस्त करीत आहेत. रानडुकरे या पिकासह उभ्या उसाचे मोठे नुकसान करीत आहेत. सायाळ हे नवीन लागवड केलेली आंबा, वड, पिंपळ, कडूनिंबाची रोपे मुळासकट खाऊन नष्ट करीत आहेत. दरम्यान, वन्यजीवांना कोणालाही पकडता व मारता येत नाही, असे वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे यांनी सांगितले.

सूर्यदर्शन नसल्यामुळे आंतरमशागत थांबली...गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतातील पिकांच्या खुरपणा व्यतिरिक्त गोगलगाय व बंदे अळी वेचण्यासाठी मजुरांना वेगळी रक्कम मोजावी लागत आहे. तणनाशक फवारणीसाठीही पावसाने उघडीप देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अनुदानाऐवजी तारेचे कुंपण करून द्यावे...शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान देण्याऐवजी त्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून देण्यात यावे. वन्यजीवांना पकडता व मारता पण येत नसल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून द्यावे. शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मिळणाऱ्या योजनेत शेतीला तारेचे कुंपणाची योजना नसल्यामुळे आजघडीला शेतकऱ्यांना एखादी योजना नाही मिळाली तरी चालेल; मात्र शेतीला तारेच्या कुंपणाची खरी गरज असल्यामुळे शासनाने यावर निर्णय घ्यावा. - बाबासाहेब पाटील, शेतकरी, हेर

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी