पतीच्या खूनप्रकरणी पत्नी गजाआड
By Admin | Updated: March 2, 2017 18:16 IST2017-03-02T18:16:55+5:302017-03-02T18:16:55+5:30
तालुक्यातील धोंडवाडी येथील एका व्यक्तीचा कौटुंबिक वादातून पत्नी व मुलानेच खून केल्याची घटना बुधवारी घडली होती.

पतीच्या खूनप्रकरणी पत्नी गजाआड
>ऑनलाइन लोकमत
जळकोट, दि. 02 - तालुक्यातील धोंडवाडी येथील एका व्यक्तीचा कौटुंबिक वादातून पत्नी व मुलानेच खून केल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी जळकाट पोलिसांनी मयताच्या पत्नीस गुरुवारी अटक केली आहे, तर मुलगा फरार आहे.
धोंडवाडी येथील लक्ष्मण घुले (वय ४५) या व्यक्तीचा बुधवारी दुपारी राहत्या घरी पत्नी व मुलानेच खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ बाबुराव घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून मयताची पत्नी गवळण घुले व मुलगा बालाजी घुले या दोघांनी लक्ष्मण घुले यांचा खून केल्याची फिर्याद जळकोट पोलिसांकडे दिली़. त्यानुसार रात्री उशिरा या दोघांविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात जळकोट पोलिसांनी आरोपी गवळण घुले हिला गुरुवारी अटक केली आहे. याप्रकरणातील दुसरा आरोपी मयताचा मुलगा बालाजी घुले हा अद्याप फरार आहे़ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.