माझ्या विरोधात १०७ ची कारवाई का केल्यास म्हणून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:33+5:302021-07-15T04:15:33+5:30
२९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण; एकास मारहाण लातूर : उदगीर तालुक्यातील लोहारा येथील सर्व्हे नंबर ६३५ मधील २९ गुंठे जमिनीवर ...

माझ्या विरोधात १०७ ची कारवाई का केल्यास म्हणून मारहाण
२९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण; एकास मारहाण
लातूर : उदगीर तालुक्यातील लोहारा येथील सर्व्हे नंबर ६३५ मधील २९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून फिर्यादीस ही जमीन माझी आहेस म्हणून मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत तिंघाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद आहे.
सर्व्हे नंबर ६३५ मधील २९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन माझी आहे म्हणून शिवीगाळ करून तू जर जमीन परत मागितलीस तर तुला मारून टाकतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. असे माधव गुरुनाथ भालके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वीरभद्र रामराव भालके व अन्य दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. शिंदे करीत आहेत.
डोक्यात मारून एकास केले जखमी
लातूर : भाचास मारहाण का केली याची विचारणा करण्यास गेलेल्या फिर्यादी व फिर्यादीच्या पुतण्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीच्या पुतण्यास लाकडाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना लातूर येथे घडली. याबाबत जनार्दन सोनाजी गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण जगन्नाथ घरमल व अन्य दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कोकणे करीत आहेत.
विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण
लातूर : विळेगाव येथील चाैकात बडीसोप खाण्यासाठी पान टपरीवर गेल्यानंतर आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादीस तू कोण रे, कुठला आहेस असे म्हणून विनाकारण चापटाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुका मार दिल्याची घटना घडली. याबाबत गणेश बाबुराव खाडे, रा. पाटोदा ता.अहमपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ तरुडे व अन्य तिघे रा. विळेगाव, ता. अहमदपूर यांच्याविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुरकुटे करीत आहेत.