शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची लॉटरी लागणार कोणा-कोणाला?

By हरी मोकाशे | Updated: May 19, 2023 17:09 IST

बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लागले लक्ष

लातूर : जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या संचालकांच्या निवडीसाठी १५ दिवसांपूर्वी रंगतदार निवडणूक झाली. त्यात पाच बाजार समित्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीने तर पाच ठिकाणी भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. आता सभापती, उपसभापती पदांच्या निवडीकडे लक्ष लागले असून, या पदांची लॉटरी कोणा- कोणाला लागणार याची उत्सुकता वाढली आहे.

जिल्ह्यात एकूण ११ बाजार समित्या आहेत. त्यापैकी शिरूर अनंतपाळ बाजार समितीची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्याने तेथील बाजार समितीची निवडणूक झाली नाही. उर्वरित दहा बाजार समित्यांसाठी एप्रिलच्या अखेरीस दोन टप्प्यांत निवडणूक झाली. यंदाही ही निवडणूक बहुतांश ठिकाणी दुरंगी झाल्याने लक्षवेधी आणि चुरशीची झाली. लातूर उच्चतम बाजार समितीवर काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.

या निवडणुकीनंतर सभापती, उपसभापती पदांच्या निवडी कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. २२ ते २५ मे या कालावधीत या निवडी होणार आहेत.

लातुरात २३ रोजी होणार निवड...लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची दि. २३ मे रोजी निवड होणार आहे. तसेच याच दिवशी उदगीर, अहमदपूर, २२ रोजी औसा, जळकोट, २४ रोजी चाकूर आणि रेणापूर तर २५ रोजी औराद शहाजानी, निलंगा, देवणी येथील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. सभापती, उपसभापती पदाची संधी ही शेतकरी गटातून विजयी झालेल्यांना दिली जाते.

उपसभापती पदासाठी फिल्डिंग...बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार करताना राजकीय पक्षाच्या प्रमुखांकडून सभापतिपदाचा संभाव्य उमेदवार निश्चित केला जातो, हे त्या पॅनलमधील उमेदवार जाणून असतात. त्यामुळे उपसभापतिपद मिळविण्यासाठी विजयी पॅनलमधील इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. तसेच ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून पॅनलप्रमुखांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

बाजार समित्यांचे पक्षीय बलाबल...लातूर-काँग्रेसरेणापूर-काँग्रेसअहमदपूर-महाविकास आघाडीउदगीर-महाविकास आघाडीजळकोट-महाविकास आघाडीनिलंगा-भाजपऔराद शहाजानी-भाजपदेवणी-भाजपऔसा-भाजपचाकूर-भाजप-शिवसेना (शिंदे गट).गेल्या वर्षीचे आर्थिक उत्पन्न...लातूर-२६ कोटी १२ लाखऔसा-३ कोटी ४२ लाखनिलंगा-१७ लाख २६ हजारउदगीर-५ कोटी ७० लाखअहमदपूर-८८ लाख ८० हजाररेणापूर-१४ लाख ८६ हजारदेवणी-१२ लाख ८५ हजारजळकोट-१९ लाख ९८ हजारऔराद शहाजानी-७६ लाख १४ हजारचाकूर-४९ लाख २१ हजार.

टॅग्स :laturलातूरMarketबाजार